खुर्चीवर बसून केवळ आदेश न देता जिथे लोकं संकटात सापडली आहेत तिथे जातीने हजार राहून पाहणी करणारे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या वेगळ्या कार्यशैलीचे लोकांकडून कौतुक होत आहे.
येळ्ळूर रोडवरील केशव नगरमध्ये पावसामुळे झालेल्या घरा घरात पाणी शिरले आहे अनेक रस्त्यावर पाणी आले आहे अश्या वेळी नितेश पाटील यांनी स्वतः अनवाणी पायाने पाण्यात उतरून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना त्या सोडण्यासाठी आदेश देखील दिले.यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी काही ठिकाणी अनवाणी फिरून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ड्रेनेज समस्यांची पाहणी केली. भारत नगर भागात कोसळल्या घराची आणि झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी केली आणि स्थानिक रहिवाशांकडून नुकसानीची माहिती घेतली.
माणसाला आपत्ती वेळी आधाराची गरज असते अश्या वेळी एकदा जबाबदार शासकीय अधिकारी स्वतः संकट स्थळी येतो आणि पीडित लोकांना धीर देऊन जातो ही कल्पनाच उबदार असते. नवीन जिल्हाधिकाईर नितेश पाटील यांच्या कार्य पद्धतीमुळे याच गोष्टींची चर्चा होताना दिसत आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान-त्वरित उपाय:
कृष्णा आणि मलप्रभा नदीपात्रात सध्या पूरस्थिती नाही. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, लवकरात लवकर सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी सांगितले.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एकूण 388 काळजी केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामंडळांतर्गत एक चिंता केंद्र तयार करण्यात आले आहे. परिस्थितीच्या आधारे अतिरिक्त केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुट्टी बाबत परिस्थिती घेऊन निर्णय
परिस्थिती लक्षात घेऊन बुधवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या पिवळा इशारा असल्याने पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी यांनी दिली. यावेळी तहसीलदार आर.के.कुलकर्णी, महामंडळाच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.