33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 19, 2022

रविवारी शहरातील या भागात बत्ती गुल असणार

गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हेस्कॉमच्या वतीनं तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत ज्यामुळे रविवार 21/08/2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. काही भागात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत...

इस्कॉन मध्ये जन्माष्टमी उत्साहात संपन्न*

बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. बलराम जयंती म्हणजे 13 ऑगस्ट पासून रोज सायंकाळी इस्कॉन चे अध्यक्ष प पु भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन झाले. शुक्रवार दि. 19 ऑगस्ट...

अडीच तासाचे कोंबींग ऑपरेशन….

मिशन बिबट्या सर्चिंग मोहीम तीव्र करण्यात आली असून शुक्रवारी गोल्फ कोर्स जंगल परिसरात वनखाते आणि पोलीस विभाग यांच्यातर्फे संयुक्त मोहीम राबविण्यात आली. बेळगाव मधील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याबरोबरच नेमका बिबट्या आहे का? या बाबतचे चित्र स्पष्ट...

मिशन बिबट्यासाठी….पोलीस वन खात्याची मोठी मोहीम

मागील पंधरा दिवसापासून रेस कोर्सच्या मैदानात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात अजूनही वनखात्याला यश आलेले नाही.बिबट्याची हुलकावणी नागरिकांसाठी भीतीदायक ठरत असून नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे.यामुळेच बिबट्याच्या शोध मोहिमेचा मोठा टप्पा म्हणून शुक्रवारी रेसकोर्स परिसरात पोलीस अधिकारी आणि वनाधिकारी यांची...

गणेश उत्सव संदर्भात आमदार अनिल बेनके यांची मोठी मागणी

बेळगाव शहरातला गणेशोत्सव कर्नाटक राज्यात सर्वात मोठा असतो. मुंबईच्या धर्तीवर बेळगाव मध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो यामुळे गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी विद्युत रोषणाई यासाठी मंडळाकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. यासाठी प्रत्येक गणेश मंडळांना विद्युत पुरवठा आवश्यक असतो. यासाठी गणपती मंडळांना...

*बोलास ड्राय फ्रुट्स आता बेळगावात उपलब्ध

काजू बीचे सर्वात मोठे व्यवस्थापकीय युनिट असलेल्या करावली स्थित बोलास कंपनीने थेट ग्राहकांना जागतिक दर्जाचे सुके मेव्याचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने बोलास फॅक्टरी आउटलेट या नावाने रिटेल बाजारात प्रवेश केला आहे. कर्नाटकाच्या इतर शहराबरोबरच बोलासची शाखा बेळगावातही दाखल झाली आहे.देशमुख...

अशी दर्शवली एकता

हिंदू, मुस्लिम,सिख, ईसाई हम है भाई भाई असे म्हटले जाते विविधतेतून एकता सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जपण्याचं महत्त्वपूर्ण कार्यशाळांमधून केले जाते हीच एकता जपत मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाला कृष्णाचचा वेश परिधान करून शाळेत श्रीकृष्णाची भूमिका...

…यासाठी झाला मच्छेत रास्ता रोको

शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दररोज शेकडो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहराकडे येत असतात. प्रामुख्याने त्यांना प्रवास करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेस वरच अवलंबून राहावे लागते.मात्र सदर बसेस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते.परिणामी यासाठी मच्छे येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बेळगाव खानापूर रोड चक्क दोन...

आयटीबीपीच्या दोन एके – 47 चोरीस

बेळगाव जवळील इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये दोन एके 47 बंदूक चोरी गेल्याची घटना गुरुवारी घडली आहे त्यामुळे खळबळ माजली आहे. बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्र मधील संदीप...

जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने…

बेळगाव लाईव्ह विशेष : घड्याळाचे काटे नेहमीच गोल फिरतात.. मात्र गेलेली वेळ कधीच येत नाही.. आणि वेळ गेल्यानंतर राहतात त्या आठवणी! अशा असंख्य आठवणींना नजरकैद करून आठवणी जिवंत ठेवणारा अवलिया म्हणजे छायाचित्रकार! १८३९ मध्ये छायाचित्रणाची सुरुवात झाली आणि फ्रान्स...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !