27 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 22, 2022

‘या’ बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याची मागणी

गरीब असहाय्य शेतकऱ्यांना हाताशी धरुन कांही दलाल अलीकडे शेतकऱ्यांला अत्यल्प रक्कम देऊन पिकाऊ जमीनीत भराव घालून छोटा शेड मारुन प्लॉट पाडवून विक्रि करत आहेत. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा गैरप्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे. यरमाळ...

बिबट्याची दहशत! क्लब रोड सामसूम!

बेळगाव शहराचा पाहुणचार घेण्यासाठी आलेला बिबट्या प्रत्येकाच्या नाकीनऊ आणत आहे! गेल्या १५ दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात तळ ठोकून असलेल्या बिबट्याने बऱ्याचवेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दर्शन दिले असून युद्धपातळीवर सुरु असलेल्या मिशन बिबट्यातून सहजपणे बिबट्या निसटला आहे. सोमवारी शिनोळीतील खाजगी...

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे विविध स्पर्धा

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव या संस्थेतर्फे सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी तसेच इयत्ता दहावी या वर्गात शिकत असलेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा स्पर्धा तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी कवी...

बिबट्याचा माग काढण्यासाठी खास श्वानपथकं मैदानात

वन खात्याला चकवा देऊन आज सकाळी रेस कोर्स जंगल परिसरात गायब झालेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता खास श्वानपथकं मैदानात उतरली आहेत. हुक्केरी येथून पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकांमध्ये मुधोळ हाऊंड श्वानांचाही समावेश आहे. बेळगाव शहर परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला...

शिवालयांमधून जणू यात्राच…

श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील शिवालये गजबजून गेली होती.शिवालयांमधून शेवटचा श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक महाआरती पानाफुलांची सजावट याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रावण सोमवार पार पडला. विविध शिव...

मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या प्रशासनाकडे या मागण्या

येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी साजरी होत असून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे कडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यंदाचा श्री गणेशोत्सव दहा...

दोन-तीन दिवसात बिबट्याला जेरबंद करू; मंत्री कत्ती यांचा विश्वास

बेळगाव शहर परिसरात वावणाऱ्या बिबट्यावर 24 तास पाळत ठेवून येत्या दोन-तीन दिवसात त्याला पकडण्याची सक्त सूचना आपण वनखात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती वनखात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिली. शहरात आज सोमवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या...

महापौर निवडणुक कधी घेणार?

महापौर उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच पडून असून यामुळे बेळगाव शहराचा विकास खुंटला आहे यामुळे तात्काळ महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली आहे सदर मागणीचे निवेदन त्यांनी रिजनल कमिशनर कार्यालयात उपस्थित राहून आर सी यांना दिले...

साॅव्हरीन गोल्ड बॉंड योजना आजपासून सुरू

टपाल खात्यातर्फे पुन्हा एकदा साॅव्हरीन गोल्ड बॉंड योजना सुरू करण्यात आली असून आजपासून पाच दिवस म्हणजे येत्या शुक्रवार दि. 26 ऑगस्टपर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. सदर योजनेअंतर्गत 5197 रुपये प्रति ग्रॅमने हा सोन्याचा साॅव्हरीन गोल्ड बॉंड ग्राहकांना खरेदी करता...

शहरांत या भागात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

बेळगाव शहर बिबट्याच्या दहशतीखाली असतानाच बेळगाव रिसालदार गल्ली मात्र कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. कारण कुत्र्यांची टोळकी या परिसरात वावरत असून यामुळे या भागातून ये जा करणे कठीण झाले आहे. सदर कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दहा...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !