शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी यावर्षी एक विशेष योजना राबवली आहे.सीमा भागातील वादग्रस्त 865 गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष योजना राबविली आहे पहिल्याच वर्षी कमी कालावधी उपलब्ध असताना सुद्धा विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे.
यासाठी महाराष्ट्र शासन शिवाजी...
बेळगावमध्ये सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आणि प्रशासनाची झोप उडवलेल्या बिबट्याला शोधण्यासाठी पोलीस आणि वनखाते पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. शोध मोहिमेचा २३ वा दिवस असूनही अद्याप या प्रयत्नांना यश आले नाही. वन खात्याने मनुष्यबळ वाढवून देखील चलाख बिबट्या अद्याप...
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गटार तुंबून मुसळधार पावसाच्या पाण्यासह दुर्गंधीयुक्त सांडपाणी केरकचरा मंदिर आणि घराघरात शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना आज सायंकाळी संभाजीनगर वडगाव येथे घडली.
गेले कांही दिवस विश्रांती घेतलेल्या मुसळधार पावसाने बेळगाव शहर परिसरात आज दुपारनंतर अचानक...
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या नेटिव्ह हॉटेल पाठीमागील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून आज या रस्त्यावरील चिखलाच्या खड्ड्यात एक मालवाहू टेम्पो रुतून पडल्याची घटना घडली.
तिसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या नेटिव्ह हॉटेल पाठीमागील चन्नम्मानगर येथून बेळगाव -खानापूर हमरस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे विकास...
बेंगलोर येथे स्वकुळ साळी समाजातर्फे आयोजित कर्नाटक राज्य पातळीय स्वकूळ साळी (विणकर) सांस्कृतिक महोत्सवात नृत्य ,अभिनय, गायन ,पोवाडा गायन, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती स्वरूपात समाजसेवा करत असल्याबद्दल बेळगावची सुकन्या कु. श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी हिचा सत्कार करण्यात आला.
बेंगलोर येथे काल शुक्रवारी...
बेळगाव शहर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग झाली असून दुपारनंतर संपूर्ण शहर आणि परिसर गारठून गेले आहे. दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुंवाधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सवानिमित्त फुललेली जारपेठेतील गर्दीदेखील दुपारनंतर कमी झाली आहे. शनिवारी दुपारी साधारण तीनच्या दरम्यान...
रखडलेल्या विकास कामांमुळे बेळगाव शहराची 'स्मार्ट सिटी' मध्ये परिवर्तन होण्याच्या दिशेने अतिशय संथ कासवगतीने वाटचाल सुरू आहे. अयोध्यानगर मंडोळी रोड या ठिकाणी सुरू असलेले ड्रेनेजचे काम स्मार्ट सिटी की महापालिकेचे? या वादात अडकल्यापासून गेली दीड वर्षे 'जैसे थे' असल्याचे...
बिबट्याच्या शोधात जंग जंग पछाडत असताना,बिबट्या मात्र हाती येत नसून बिबट्या अजूनही जोमातच आहे. राज्य वनमंत्री उमेश कत्ती यांनी तीन दिवसात बिबट्या जेरबंद करावा असे आदेश वन खात्याला दिले होते मात्र आता 23 दिवस उलटले असून बिबट्या मात्र जेरबंद...
बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात केली असून त्याच्याकडून 26 हजार रुपये किमतीचा 1 किलो 3 ग्रॅम इतका गांजा व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
गणेश राजू टिटंबी (वय 21, रा. खासबाग)...
निरनिराळ्या गोष्टी आजमावल्या जात आहेत आणि आपल्याला नवी कल्पना सुचली असे प्रत्येकालाच वाटत आहे. यापैकी किती जणांना पूर्वाअनुभव आहे देव जाणे. त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत प्रशासन आणि संबंधित खात्यावर विनोद करणे त्यांची खिल्ली उडवणे बंद झाले पाहिजे. यामुळे परिस्थिती अधिकच...