Monday, April 29, 2024

/

कितीदा नव्याने तुला शोधावे!

 belgaum

रेसकोर्स परिसरात अथक परिश्रम करून देखील बिबट्याला शोधण्यात अपयश आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी 23 दिवसापासून वन खाते व पोलीस विभाग प्रयत्नशील आहे.मात्र तरीदेखील बिबट्या जेरबंद झालेला नाही यामुळे नेमका कोणता उपाय घेऊ हाती असा प्रश्न उपस्थित होत असताना वनविभाग शनिवारी पुन्हा नव्या निर्धाराने सज्ज झाला आहे. रेस कोर्स जंगलात दोन ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन आयोजित करत सकाळी बारापासून पुन्हा नव्याने बिबट्याची शोध मोहीम सुरू झाली आहे.

अडीचशे एकरच्या रेस कोर्स जंगलात साधारण 350 हून अधिक कर्मचारी या ठिकाणी बिबट्याला शोधण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाही यासाठी रेस कोर्स मैदानात आता 40मीटरचा पिंजरा लावण्यात आला असून 350 कर्मचाऱ्यांची दोन भागात विभागणी करून सदर जंगलात दोन ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. 5 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान साधारण 23 दिवस बिबट्याला शोधून देखील बिबट्या मोकाट फिरत असल्याने शनिवारी कोणत्याही प्रकारे बिबट्याला शोधणार असा निर्धार करत वनविभाग कोंबिंग ऑपरेशनला करत आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे बिबट्या जितका भीतीदायक आहे तितकाच बिबट्याला पकडण्यासाठी चा खर्च देखील मोठा आहे. कारण बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत असणारे कर्मचारी आणि वापरण्यात येणारे साहित्य यासाठी साधारण दिवसा काठी तीन ते चार ते लाखाचा खर्च येत असून आतापर्यंत बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने 40 लाखाहून अधिक रुपये खर्च केले आहेत मात्र अजूनही बिबट्या हाती आलेला नाही.Race course

 belgaum

बिबट्याला पकडण्यासाठी रेस कोर्स मैदानात ट्रॅप कॅमेरे,पिंजरे,ड्रोन कॅमेरा, च्या बरोबरच मुधोळ जातीची कुत्रीही या ठिकाणी आणण्यात आली. यानंतर हत्ती देखील रेस कोर्स मैदानात सोडण्यात आले. सेन्सर कॅमेरा अवलंबण्यात आला मात्र अजूनही बिबट्या चकवा देत असून शनिवारी कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध जोरदार शोध सुरू आहे.

प्रयत्न व्यर्थ जाऊ नयेत यासाठी मिशन बिबट्या दररोज अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आज तरी बिबट्या सापडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.