Thursday, May 9, 2024

/

मालमत्ता कराचा भरणा सुरूच : प्रामाणिक करदात्यांना त्रास

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेची अकार्यक्षमता करदात्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषत: ऑनलाइन कर भरण्याच्या बाबतीत, याला कारणीभूत पैसे भरून घेणारी अकार्यक्षम प्रणाली (पेमेंट सिस्टम) आणि प्रतिसाद न देणारी वेबसाइट या दोन गोष्टी आहेत.

एप्रिलमधील 5 टक्के सूट मिळविण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना वेबसाइटच्या साध्या समस्यांचे निराकरण करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

इतर शहरांप्रमाणे मालमत्ता कर भरणा सुरळीत न होता बेळगावच्या रहिवाशांना प्रत्येक टप्प्यावर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच पेमेंट गेटवे एचडीएफसी वरून पेयूकडे स्थलांतरित केल्याने समस्या आणखी वाढली आहे. असंख्य अहवालांसह नवीन प्रणाली योग्यरित्या कार्य करत नसल्याची तक्रार आहे. महापालिकेची

 belgaum

https://belagavicitycorp.org/WebSiteBGM/Home.aspx ही वेबसाइट 15 एप्रिल रोजी सुप्तावस्थेतून उभी राहिली आणि पुढील फक्त दोनच दिवसांत विविध कर आणि इतर शुल्कांची गणना करण्यात अडचणी येऊ लागल्या. या कालावधीत पैसे भरणा केलेल्या अनेक करदात्यांना त्यांच्या थकबाकीच्या भवितव्याबाबत अनिश्चितता आहे.

रेडी रेकनर किमतींचा समावेश करून 18 एप्रिलपर्यंत समस्या निवारण्याचा प्रयत्न करूनही वेबसाइटवर अनेकांसाठी कोरी चलन प्रदर्शित होणे सुरूच आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे निवासी संकुलांसाठी (अपार्टमेंट्स) चलन तयार करणे निष्क्रिय बनण्याचा प्रकार करात सूट मिळविण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना रहिवाशांना अडचणीत आणणारा ठरला आहे.

दरम्यान, करात सूट (रिबेट) देण्याची मुदत वाढवण्याच्या शक्यतेवर सरकारने मौन बाळगले आहे. सर्वसामान्यपणे जुलैपासून 2 टक्के दंड आकारला जातो. ऑफलाइन चलन मिळविण्यासाठी मोठी गर्दी असल्यामुळे चलन न मिळता पदरी निराशा पडते.

सध्या बेळगाव महापालिका दाखवत असलेल्या अकार्यक्षमतेमुळे करदात्यांची गैरसोय तर होतेच, शिवाय कारभारावरही वाईट परिणाम होत आहे. रहिवासी त्यांची नागरी कर्तव्ये पार पाडण्यासाठी धडपडत असताना परिस्थिती सुधारण्यासाठी आणि प्रणालीवर विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी तातडीची कार्यवाही होणे आवश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.