Thursday, May 9, 2024

/

‘या’ठिकाणी असेल मोदींचा मुक्काम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बेळगाव दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी बेळगावमध्ये मुक्काम करणार आहेत. काकती येथील जोल्ले ग्रुपने बनवलेल्या आयटीसी वेलकम या हॉटेलमध्ये पंतप्रधानांचा आज मुक्काम असेल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मालिनी सिटी येथे होणाऱ्या भव्य सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत. आज महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये त्यांचा रोड शो पार पडल्यानंतर रात्री ते बेळगावमध्ये दाखल होतील.

सुमारे ५ एकर जागेत वसविलेल्या आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये ११६ खोल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनासाठी हॉटेलमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून उद्या सकाळी १० वाजता येडियुरप्पा मार्गे मालिनी सिटी येथील भाजपच्या प्रचार सभेला ते उपस्थित राहणार आहेत.

 belgaum

मोदींच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल सकाळी ६ ते २८ एप्रिल सायंकाळी ६ वाजेपर्यंत नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान मानवरहित हवाई उड्डाणे, ड्रोन उडविण्यास बंदी घालणारा आदेश जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधानांचे बेळगावमध्ये सांबरा विमानतळावर आगमन होईल. त्यांचे आगमन झाल्यानंतर पंधरा विविध समाजाच्या नेत्यांना पंतप्रधानांच्या स्वागतासाठी परवानगी देण्यात आली आहे. विविध पंधरा समाजाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती पंतप्रधानांचे स्वागत करतील. पंतप्रधानांचा बेळगाव मुक्काम शनिवारी रात्रीपासून सुरू होणार आहे मात्र यादरम्यान कोणत्याही बैठक किंवा भेटीचे नियोजन नाही.Modi

पंतप्रधानांच्या सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी आवाहन

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बेळगावमध्ये दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बेळगावमध्ये आगमन झाल्यानंतर ते रविवारी होणाऱ्या मालिनी सिटी येथील प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. या सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही कारणास्तव काळे निशाण, पत्रके,शस्त्रे, विषारी तसेच स्फोटक पदार्थ, पाण्याच्या बाटल्या इत्यादी आणण्यास मनाई आहे. निषिद्ध करण्यात आलेल्या वस्तू आढळल्यास संबंधित नागरिकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही, शिवाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे शहर पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.