Thursday, May 30, 2024

/

उद्या जाहीर होणार एसएसएलसी निकाल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार दि. 9 मे 2024 रोजी सकाळी 10:30 नंतर जाहीर केला जाणार आहे अशी माहिती कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील यंदाची एसएसएलसी परीक्षा गेल्या 25 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यामुळे उद्या गुरुवारी 9 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कर्नाटक शालांत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या अध्यक्षांनी कळविले आहे.

 belgaum

एसएसएलसी परीक्षेचा निकाल उद्या सकाळी 10:30 वाजल्यानंतर https://karresults.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.