Thursday, March 28, 2024

/

बिबट्या पुन्हा जोमात… वनखाते कोमात…

 belgaum

बिबट्याच्या शोधात जंग जंग पछाडत असताना,बिबट्या मात्र हाती येत नसून बिबट्या अजूनही जोमातच आहे. राज्य वनमंत्री उमेश कत्ती यांनी तीन दिवसात बिबट्या जेरबंद करावा असे आदेश वन खात्याला दिले होते मात्र आता 23 दिवस उलटले असून बिबट्या मात्र जेरबंद झालेला नाही. बिबट्याने शनिवारी दुपारी पुन्हा वनखात्याच्या हातावर तुरी दिली असून अरगन तलावात पाणी पिण्यासाठी आलेला बिबटया पून्हा हातातून निसटला.

माणसाची चाहूल लागताच बिबट्याने त्या ठिकाणाहून चकवा देत पलायन केले.यामुळे पुन्हा एकदा मिशन बिबट्या फसले असल्याचे दिसून आले.
यामुळे पुन्हा वनखाते अखेर सुस्तावल्याचे दिसून आले. यामुळे बिबट्या जोमात वन खाते कोमात असल्याची स्थिती निर्माण झाली. तर दुसऱ्या बाजूला नागरिक पर्यटनाचा आनंद लुटत हत्तीला पाहत असे चित्र पाहायला मिळाले

विविध माध्यमातून बिबट्याची शोध मोहीम राबवण्यात येत आहे.शनिवारी सकाळी कोंबिंग ऑपरेशन सुरू झाले.मात्र बिबट्याला शोधण्यात यश आले नाही. यामुळे अखेर वनविभागाचे कर्मचारी गांधी चौक या ठिकाणी सुस्तावल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या बाजूला जंगल परिसरात पर्यावरणाचा आनंद लुटत ये जा करणाऱ्या नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी दाखल झालेल्या हत्तीला पाहत थांबल्याचे दिसून आले यामुळे वन खाते बिबट्याला शोधून कोमात आणि नागरिक पर्यटनाचा आनंद लुटण्यात असे चित्र पाहायला मिळाले.Forest race course

 belgaum

बिबटयाची दहशत असल्याने मागील आठवड्याभरापासून त्या 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढत असताना अनेक समस्या जाणवणार आहेत. तसेच वनखाते बिबट्याला शोधून थकले असून त्या ठिकाणी संधी मिळताच सुस्तावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिवसाकाठी मोठी रक्कम खर्च करून देखील बिबट्या जेरबंद होत नसल्याने थोडासा विसावा म्हणत वन खाते विसावले तर नागरिकांनी हत्तीला पाहून पर्यटनाचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.