belgaum

नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस आमदारांची मते काय?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमुळे राजकीय परिस्थिती कमालीची तापली असून, या नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस आमदारांमध्ये वेगवेगळे सूर उमटत आहेत. हायकमांडचा निर्णय अंतिम मानत सतीश जारकीहोळी यांच्या नावाला पाठिंबा देण्यासोबतच, नवीन आमदारांनाही मंत्रिमंडळात संधी मिळावी, अशी मते आमदारांकडून व्यक्त केली जात आहेत.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री बदलासंदर्भात हायकमांडच्या निर्णयाचे सर्व आमदार आणि मंत्र्यांना पालन करावे लागेल. सध्यातरी मुख्यमंत्री बदलाबाबत कोणताही अधिकृत संदेश आलेला नाही किंवा विधिमंडळ पक्षाच्या बैठकित पूर्वसूचना मिळालेली नाही. सिद्धरामय्या हे संपूर्ण राज्याचे मास लीडर आहेत. सतीश जारकीहोळी हे आमचे नेते असून त्यांनी मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. जर त्यांच्याकडे केपीसीसी अध्यक्षपद दिले तर पक्ष अधिक वेगाने वाढेल, असे आसिफ सेठ यांनी म्हटले.

मंत्रिपदाबाबत बोलताना आसिफ सेठ यांनी सांगितले की, बेळगाव शहरच्या आमदाराला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही, आम्हालाही उत्तर कर्नाटकची सेवा करण्याची इच्छा असून आम्हीही मंत्रिपदासाठी इच्छुक आहोत. डी. के. शिवकुमार यांनीही पक्ष संघटनेसाठी मोठे परिश्रम घेतले असून हायकमांड सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेईल, असे आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले.

 belgaum

दुसरीकडे, आमदार विश्वास वैद्य यांनी सांगितले की, यल्लम्मा प्राधिकरणाच्या बैठकित निमित्त आपण सध्या बेळगावमध्ये असल्याने नेतृत्व बदलाच्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नाश्ता बैठकित बाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. सीएलपी बैठकित बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, उद्या पक्षाकडून संदेश आला तर आपण बैठकित जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

सतीश जारकीहोळी यांना केपीसीसी अध्यक्षपद दिल्यास ते उत्तम काम करतील आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मदत करतील. आपल्याला मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही, मात्र चार-पाच महिन्यांपूर्वी बेंगळूरमध्ये १३६ आमदारांपैकी प्रथमच निवडून आलेल्या सुमारे ४० टक्के आमदारांची बैठकित झाली होती, यात नवख्या आमदारांनाही संधी द्यावी अशी मागणी आम्ही केली होती, असे विश्वास वैद्य यांनी नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.