बेळगाव लाईव्ह :कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे येत्या गुरुवार दि. 9 जुलै रोजी 2026 बेळगाव दौऱ्यावर येत असून बेळगावमध्ये ते प्रादेशिक विभाग स्तरावरील खात्यांची प्रगती आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री डी के शिवकुमार गुरुवारी सकाळी 9 वाजता एचएएल विमानतळ बेंगलोर येथून विशेष विमानाने बेळगावला प्रयाण करतील. बेळगाव सांबरा विमानतळावर सकाळी 10:10 वा. आगमन झाल्यानंतर ते सकाळी 10:15 वाजता सांबरा येथून रस्ते मार्गे 10:30 वा. ते सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे पोहोचतील.
त्या ठिकाणी बेळगाव प्रादेशिक विभाग स्तरावरील खात्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दुपारी 3:20 वाजता सांबरा विमानतळावरून पुन्हा बेंगलोरला प्रयाण करतील.
मुख्यमंत्र्यांच्या या बेळगाव दौऱ्याबाबत त्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एस. श्रीधर यांनी पत्रकाद्वारे उपरोक्त वेळापत्रकाची माहिती दिली आहे.




