belgaum

प्रभुनगर पुलाजवळ दुचाकीचा अपघात; ३७ वर्षीय स्वाराचा मृत्यू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नारायण परशुराम कुंडेकर (वय ३७, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, ता. जि. बेळगाव) असे मृताचे नाव असून, मंगळवारी (ता. २० ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण कुंडेकर हे होंडा शाईन मोटारसायकलवरून (क्र. केए-२२/ईक्यू-७७६८) गणेबैल येथून बेळगावच्या दिशेने जात होते.

बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ ए वरील प्रभुनगर परिसरात आल्यानंतर ते सर्व्हिस रस्त्यावरून प्रवास करीत होते.

 belgaum

दरम्यान, प्रभुनगर पुलाजवळ त्यांच्या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात कुंडेकर यांच्या डोक्याला, हाताला आणि पोटाच्या भागाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.