belgaum

वृद्ध भगिनींच्या मदतीसाठी धावले माजी आमदार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील कॅम्प भागातील महिला पोलीस ठाण्याजवळ दोन वृद्ध बहिणी प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने तयार केलेल्या शेडमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

सततच्या मुसळधार पावसामुळे या शेडची मातीची भिंत पूर्णपणे भिजली असून, ती कधीही कोसळण्याच्या भीतीने या हतबल भगिनींचा जीव धोक्यात आल्याची बातमी समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.

या वृद्ध महिलांच्या अतोनात हालांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडे लेखी विनंती करण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले.

 belgaum

या प्रकरणाची सोशल मीडियाद्वारे दखल घेत माजी आमदार अनिल बेनके आणि समाजसेवक संतोष दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित वृद्ध महिलांच्या कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांना मदतीचा शब्द दिला.

तसेच, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि छावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या हतबल वृद्ध महिलांना तातडीने सुरक्षित शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार अनिल बेनके आणि समाजसेवक संतोष दरेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.