Sunday, May 5, 2024

/

शहरातील पूरग्रस्तांच्या नुकसानीची तपासणी- २४ तासांत मदत वाटपाची कार्यवाही

 belgaum

सोमवारी जोरदार पाऊस असूनही शहरातील विविध भागात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली व पण एक कार्य तत्पर अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे.

येळ्ळूर रोडवरील केशव नगर येथील अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालयाला भेट देऊन खबरदारीचा उपाय म्हणून केअर सेंटर उभारण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, “मुसळधार पावसामुळे शहरातील 10 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून, 4 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. पूरग्रस्त घरांना 24 तासांत नुकसान भरपाई देण्यात येईल.”

जिल्हाधिकाऱ्यांनी येळ्ळूर रोडवरील केशव नगर, भारत नगर वडगाव, रघुनाथ पेठ अनगोळ आदी ठिकाणांना भेटी देऊन तहसीलदार व मंडळाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या, की कोणत्याही गाडीला उशीर होणार नाही, यासाठी कार्यवाही करण्यात यावी. जुनी घरे कोसळण्याची शक्यता असल्यास अशा घरांची ओळख पटवून लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

 belgaum

तसेच घर पूर्णपणे कोसळल्यास ४८ तासांत नुकसान भरपाई दिली जाईल. यासंदर्भात सर्वेक्षण त्वरीत पूर्ण करा, कागदपत्रांच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.Dc nitesh patil vadgav

वडगाव येथील पडलेल्या घराला मिळणार नुकसान भरपाई

भारत नगर वडगाव येथे शेजारील घरांची भिंत कोसळल्याने कोणत्याही क्षणी घरे कोसळण्याची शक्यता असल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असता घर गमावलेल्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारव इतर अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी करून नियमानुसार भरपाई देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.

तहसीलदारांना दस्तऐवज तपासून त्वरित आरटीजीएस करण्याच्या सूचना देत काही तासांत मदत देण्याचे निर्देश दिले. भारत नगर येथील घराजवळ उभ्या असलेल्या ओमनी वाहनाचे पूर्ण नुकसान झाले असून वाहन मालकाने नुकसान भरपाईचे आवाहन केले आहे. कागदपत्रे दिल्यास नुकसान भरपाईही दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बेळळारी नाला समस्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बैठक-

बेळळारी नाल्यामुळे शहराला दरवर्षी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

सध्या ही समस्या तात्पुरती सोडवण्यासाठी पाच कोटी रुपये खर्चून ड्रेनेजचे काम हाती घेण्यात येणार आहे.बेळळारी नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करून प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.