मेन रोड मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी रमेश शंकर पाटील यांचा उमदा बैल शुक्रवारी पहाटे लंपी स्किनमुळे मृत्युमुखी पडला. सदर बैल सुमारे 60 हजार रुपये किमतीचा होता.
मेन रोड मुतगा येथील शेतकरी रमेश शंकर पाटील यांचा शेतीचा बैल लंपी...
बेळगाव शहरा नजीकच्या कणबर्गी तलावाची देखभाल आणि तेथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याच्या दृष्टीने एजन्सीची निवड करण्यासाठी बेळगाव महापालिकेच्यावतीने मनपा आयुक्तांनी प्रस्ताव (आरएफपी) मागविले आहेत.
कणबर्गी तलाव येथे उपलब्ध करावयाचे उपक्रम : प्रकल्प चालकाने किमान पुढील उपक्रम उपलब्ध केले पाहिजेत. जलविहारासाठी...
कित्तूर संस्थानाचा किल्ला आणि सध्या अस्तित्वात असलेला राजवाडा यांच्या यथास्थिती संरक्षणाबरोबरच पर्यटकांना योग्य माहिती मिळावी या दृष्टिकोनातून योग्य अशी योजना आखण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
राणी चन्नम्मा यांचा कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला आज शुक्रवारी...
बेळगांव शहर व तालुका फोटो आणि व्हिडियोग्राफर असोसिएशनच्या नुकतीच संपन्न झालेल्या बैठकीत छायाचित्रणाचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बापट गल्ली येथील गिरीश काॅम्पलेक्सच्या शहिद भगत सिंह सभागृहात बेळगांव शहर व तालुका फोटो आणि व्हिडियोग्राफर असोसिएशनची बैठक संपन्न झाली. यावेळी...
दसरा -नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरात मोठ्या जल्लोषात श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जात आहे. विशेष म्हणजे या दौडला पोलीस प्रशासन देखील समरसून साथ देत आहे.
याची प्रचिती आज शिवभक्तांना आली जेंव्हा खुद्द सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) नारायण बरमनी यांनी...
सणांची मांदियाळी सुरू झाली की सुट्ट्यांची संख्या देखील वाढते.त्यातही यंदा दसरा आणि दिवाळी हे वर्षातील मोठे सण एकाच महिन्यात आल्यामुळे सुट्ट्याच सुट्ट्या असा अनुभव येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच या ऑक्टोबर महिन्यात एकूण 11 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
यामुळे बँकांबरोबरच...
'जय भवानी' 'जय शिवाजी'च्या गजरात दौडचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील दौड मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे शिवचरित्र आणि शिवजन्माचा इतिहास तरुणाई पुढे सादर होत आहे.
बेनकनहळी गावात देखील शुक्रवारी भव्य अशी दौड निघाली आणि यामुळे चैतन्यमय आणि...
लंपी स्किन रोगाचा कहर शहरांमध्येही सुरू होणार की काय? अशी भीतीयुक्त शंका व्यक्त केली जात असून काल गुरुवारी सराफ गल्ली मागोमाग रात्री कोरवी गल्ली जुने बेळगाव येथे एका दुभत्या गाईचा लंपी स्कीनमुळे मृत्यू झाला.
सदर गाय कोरवी गल्ली जुने बेळगाव...
विविध शासकीय विभागांच्या मंजुरीनंतर कणबर्गी निवासी योजनेचा आराखडा आता मंत्रिमंडळ मंजुरीसाठी बेंगलोरला पाठविण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळतात निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्याद्वारे बुडाकडून लगेचच या योजनेचे काम सुरू होईल.
कणबर्गी योजनेचा...
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांशी बायसिकल शेअरिंग योजनेसाठी 300 सायकली दाखल झाल्या असून शहरातील पहिल्या 10 डॉकिंग स्टेशनच्या निर्मितीचे काम पूर्ण होताच येत्या नोव्हेंबरमध्ये भाडेतत्त्वावर सायकल मिळणारी ही योजना कार्यान्वित होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार सायकल शेअरिंग योजनेतील सायकली...