सणांची मांदियाळी सुरू झाली की सुट्ट्यांची संख्या देखील वाढते.त्यातही यंदा दसरा आणि दिवाळी हे वर्षातील मोठे सण एकाच महिन्यात आल्यामुळे सुट्ट्याच सुट्ट्या असा अनुभव येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच या ऑक्टोबर महिन्यात एकूण 11 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
यामुळे बँकांबरोबरच सरकारी कार्यालय देखील महिन्यातील जवळ जवळ 11 दिवस बंद असणार आहेत.यामुळे बँक तसेच सरकारी कामांचे व्यवहार सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करावे लागणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात म्हणजेच मंगळवार दिनांक 4 रोजी खंडे नवमी तर 5 रोजी विजयादशमी असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे तसेच दिनांक 8 रोजी दुसरा शनिवार तर 22 रोजी चौथा शनिवार असणार आहे .24 रोजी नरक चतुर्दशी व 26 रोजी दिवाळी पाडवा असल्याने या दोन सुट्ट्या देखील मिळणार आहेत यामुळे या महिन्यात एकूण 6 सुट्ट्या असून 5 रविवार देखील आले आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालय तसेच बँक यांना आक्टोंबर महिन्यात जवळजवळ 11 दिवस सुट्टी असणार आहे.
प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात येणारी गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी देखील सरकारी सुट्टी असते तसेच ईद-ए-मिलादची देखील सुट्टी असते. मात्र हे दोन्ही सण रविवारी आल्यामुळे या दोन सरकारी सुट्ट्या कमी झाले आहेत.यामुळे ऑक्टोबर महिन्यात 11 दिवस कामकाज बंद राहणार आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात आर्थिक व्यवहारावर तसेच सरकारी कामकाजावर देखील परिणाम होणार आहे विविध खरेदीच्या निमित्ताने सण समारंभात आर्थिक व्यवहार वाढतात मात्र बँकांनाच सुट्टी राहिल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या सण समारंभावर होणार असून सुट्ट्यांपूर्वीच आर्थिक व्यवहार पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत.