belgaum

अखिल भारतीय राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेला बेळगावात उत्साहात प्रारंभ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव काँट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन आणि कर्नाटक राज्य बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. देशभरातील १०० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

तिसऱ्या रेल्वे ब्रिजजवळील एका खाजगी येथील सभागृहात शनिवार व रविवार या दोन दिवसांत ही स्पर्धा पार पडणार आहे. शनिवारी सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभाला असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू, आनंद गाडगीळ, एम. आय. हेगडे, नितीन लोकुर, सिद्धार्थ चंदगडकर आणि सुब्रमण्यम यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा, बंगळूरसह विविध राज्यांतील स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

 belgaum

यावेळी बोलताना त्यांनी ब्रिज या खेळाचे महत्त्वही अधोरेखित केले. ब्रिज हा जगातील १०० हून अधिक देशांत खेळला जाणारा लोकप्रिय पत्त्यांचा खेळ असून तो केवळ नशिबावर आधारित नसून बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, संभाव्यतेचे विश्लेषण, अचूक निर्णयक्षमता आणि संघभावना यांची कसोटी पाहणारा खेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिज खेळामुळे मानसिक ताजेपणा वाढतो, स्मरणशक्ती सुधारते तसेच विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये मानसिक थकवा आणि स्मरणशक्तीची घसरण कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी असोसिएशनचे सदस्य नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापुरे, आर. एल. बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.