belgaum

पाटील मळ्यात रस्ता व नाल्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: पाटील मळा परिसरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने रस्ता आणि नाल्यांच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नाल्यांच्या समस्यांमुळे नागरिकांना अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर विकासकामाचा शुभारंभ झाल्यानंतर आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील गटारांची स्थिती, पाण्याचा निचरा आणि इतर नागरी समस्यांची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी गल्लीतील महिला आणि नागरिकांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या. रस्ते, गटारे तसेच परिसरातील अन्य आवश्यक सुविधांबाबत त्यांनी लक्ष वेधत प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

 belgaum

नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार आसिफ सेठ यांनी परिसरातील समस्यांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.