belgaum

५१ नंबर स्क्रीन पाईपलाईन रोड परिसर अंधारात

0
222
Hescom
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहरातील ५१ नंबर स्क्रीन पाईपलाईन रोड परिसरातील अमृत मलम फॅक्टरीसमोरील भागात रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कोणताही पाऊस किंवा वादळ नसतानाही अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी HESCOM कार्यालयाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तब्बल १५ ते २० वेळा फोन करण्यात आले. काहीवेळा फोन उचलून “कर्मचारी पाठवत आहोत” असे सांगण्यात आले, मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तसेच HESCOM च्या लँडलाईन क्रमांकावरही जवळपास ५० ते ६० कॉल करण्यात आले. मात्र फोन सतत एंगेज लागत असल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना अंधारात वेळ काढावा लागत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 belgaum

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) वैयक्तिक लक्ष घालून HESCOM प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण मागवावे आणि तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.