belgaum

दसरा सुट्टीत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांवर कारवाईची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या दसरा सुट्टीच्या कालावधीत काही खासगी शाळांकडून वर्ग, परीक्षा आणि इतर शैक्षणिक उपक्रम सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना कर्नाटकचे अध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.

दिनांक 3 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2026 या कालावधीत शाळा-महाविद्यालयांना दसरा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या सुट्टीदरम्यान काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे अतिरिक्त क्लासेस घेत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

“विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करूनही त्यांचे क्लासेस घेणे योग्य नाही. सुट्टीच्या काळातही अभ्यास आणि परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांवर टाकला जात आहे. हिंदूंच्या प्रमुख सणाच्या काळातच काही संस्था मुद्दाम अतिरिक्त वर्ग का घेतात?” असा सवाल रविकुमार कोकितकर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.

दसरा हा कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक सण असून, विद्यार्थ्यांना कुटुंबीयांसोबत तसेच समाजासोबत वेळ घालवता यावा आणि सांस्कृतिक परंपरांशी त्यांचा परिचय व्हावा, हा सुट्टीमागील उद्देश असल्याचे श्रीराम सेनेने निवेदनात म्हटले आहे.

 belgaum

सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवणाऱ्या संस्थांची तात्काळ तपासणी करावी, परीक्षा किंवा अनिवार्य वर्ग घेणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, संबंधित शाळांची उपस्थिती नोंदवही, परीक्षा वेळापत्रक, CCTV फुटेज आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारांना लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेनेने केली.

हे निवेदन डीडीपीआय हिरेमठ यांना देण्यात आले. शासनाचा सुट्टीचा आदेश सर्व शिक्षण संस्थांमध्ये समान पद्धतीने लागू करावा आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.