belgaum

बेळगावात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय सहावे विज्ञान संमेलन!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शहरातील सीपीएड मैदानावर येत्या २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय सहाव्या विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत संमेलनाचे नियोजन, विद्यार्थ्यांचा सहभाग, वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित प्रदर्शन मांडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी अशा संमेलनांचे महत्त्व मोठे आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील सरकारी तसेच खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले.

 belgaum

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या संमेलनाचा लाभ घेता यावा, यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासह पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि विविध वैज्ञानिक संशोधन व नवकल्पनांवर आधारित प्रदर्शनांचे स्टॉल उभारण्यावर भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करून त्यांना नवीन संशोधन आणि आविष्कारांसाठी प्रोत्साहित करणारे हे संमेलन ज्ञानाधारित समाजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, राज्य वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हुलिकल नटराज, आमदार आसिफ सेठ, शहर पोलीस आयुक्त प्रकाश निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.