belgaum

सजावट क्षेत्रातील हातांना मिळाली स्नेहमेळाव्याची साथ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगावातील पेंडाल आणि विद्युत सजावट क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनी एकत्र येत स्नेह, आपुलकी आणि बंधुभावाचा आनंद अनुभवला. बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने जुन्या पी. बी. रस्त्यावरील साई भवन येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

विविध कार्यक्रम आणि भेटीगाठींच्या माध्यमातून या क्षेत्रातील व्यावसायिकांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. वर्षभर विविध कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या सदस्यांनी या निमित्ताने एकत्र वेळ घालवला. व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

पेंडाल उभारणीपासून विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या सजावटीपर्यंत अनेक कामांमध्ये योगदान देणाऱ्या व्यावसायिक व कामगारांचा या मेळाव्यात सहभाग होता. संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र राहून क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

 belgaum

कार्यक्रमाला खासदार जगदीश शेट्टर, मंत्री सतीश जारकीहोळी, प्रशांत अग्रवाल, सागरभाई चौहान, नारायण चौगुले, भाऊराव मन्नोळकर, महादेव मन्नोळकर, दामोदर रतन आणि परशुराम साळुंखे उपस्थित होते. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. अनिल अंबरोळे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.