belgaum

मांजाविरोधात एसपी रामराजन यांचीही मोहीम;

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याचा उत्साह वाढणार असताना धोकादायक मांजा दोऱ्याचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना केले आहे.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना रामराजन यांनी मांजामुळे होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. गुरुवारी दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सणाच्या उत्साहात निष्काळजीपणा करून दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

 belgaum

मांजाच्या विक्री आणि वापरावर आधीच बंदी असून, तरीही काही जण त्याची विक्री किंवा वापर करण्याची शक्यता असल्याने पोलीस यावर विशेष लक्ष ठेवणार आहेत. कोणताही व्यापारी मांजा विकताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एसपी रामराजन यांनी दिला.

पतंग उडविताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. व्यापाऱ्यांनी मांजा विकू नये आणि नागरिकांनीही तो खरेदी करू नये. जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस आयुक्तांच्या मांजाविरोधातील मोहिमेनंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनीही मांजाच्या विक्री-वापरावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.