पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. विविध सण असो अथवा उपक्रम याचा निसर्गाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता माणसाने घ्यायला हवी.म्हणूनच गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सारी बेळगाव नगरी सज्ज असताना, रोटरी क्लब ऑफ बेळगाव...
शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गुरुवारी सामूहिक सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्णपणे मोफत आणि सामुदायिक स्वरूपातील या कार्यक्रमात बेळगाव शहर आणि परिसरातील तसेच शांताई वृद्धाश्रमातील असे एकत्रित 81 जण सहभागी झाले होते. वयाच्या 80 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या अर्थात...
गेल्या जवळपास 22 दिवसापासून शहरात दाखल झालेल्या बिबट्याला शोधून पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून आज गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हिंडलगा गणेश मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मिलिटरी कॉर्टर्स परिसरात बिबट्याचे पुन्हा दर्शन घडले आणि नेहमीप्रमाणेच त्याला जेरबंद करण्यात...
गोल्फ मैदान येथे ठाण मांडून असलेल्या बिबट्याला सध्या जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जर तो मनुष्यासाठी घातक ठरला तर त्याला वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार सरकारच्या आदेशावरून ठार केले जाऊ शकते, अशी माहिती प्रसिद्ध वकील ॲड. मारुती कामाणाचे यांनी...
उत्तर कर्नाटकात बेळगाव येथे दुसरे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी असंख्य वकिलांनी मोर्चाने...
बेळगाव गोल्फ मैदान परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडले आहे. वनखात्यातर्फे या ठिकाणी बसविण्यात आलेल्या 10 क्रमांकाच्या कॅमेऱ्याने बिबट्याची छबी टिपली असून या छबीमध्ये काल रात्री 10:22 वाजण्याच्या सुमारास बिबट्या गोल्फ मैदानावर वावरतानाचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे वनखाते आता...
बिबट्या रेस कोर्स परिसरात असल्याचे समजताच विद्यार्थ्यांच्या खबरदारीच्या दृष्टिकोनातून या परिसरतील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली होती. 8 दिवसाच्या कालावधीनंतर 16 ऑगस्ट पासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र बिबट्याचे दर्शन होताच सोमवार पासून शाळा बंद करण्यात आल्या...
बिबट्याच्या शोध मोहिमेला पंधरवडा उलटून गेला आहे.तरीदेखील बिबट्याला शोधण्यात वनविभागाला यश आलेले नाही. हाती बनेंगे साथी याप्रमाणे शिमोगा येथून आणलेल्या हत्तीवरून बुधवारी सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात आली.मात्र हत्तीवरून शोध मोहिमेचा पहिला दिवस अपयशी ठरला आहे. यामुळे गुरुवारी पुन्हा सकाळपासूनच...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने भारतमाला योजनेतील बेळगाव -जांबोटी -साखळी रस्ता अर्थात चोर्ला रस्ता विकास कामासाठी वन्यजीव विभागाची 'ना -हरकत' घेण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे.
बेळगाव -जांबोटी -साखळी या चोर्ला रस्त्याच्या सुधारणेच्या कामाबाबत पर्यावरण प्रेमी गिरीधर कुलकर्णी यांनी राष्ट्रीय...
आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने आयोजित शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौक येथील श्री समादेवी मंदिर सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी...