Friday, April 26, 2024

/

या संस्थेचा पर्यावरण संवर्धनासाठी असाही उपक्रम…

 belgaum

पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. विविध सण असो अथवा उपक्रम याचा निसर्गाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता माणसाने घ्यायला हवी.म्हणूनच गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सारी बेळगाव नगरी सज्ज असताना, रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ या संस्थेने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संरक्षणाचा वसा हाती घेतला आहे.

इको फ्रेंडली गणपती तयार करून बेळगावकरांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. गणेश उत्सव बेळगावात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे विविध आकर्षक गणेश मूर्ती हे बेळगावचे खास वैशिष्ट्य.मात्र अशावेळी पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी चक्क चिखलाचे गणपती उपलब्ध करून देण्यात आले आहेत साधारण एक तासाच्या आत पाण्यात विघटन होणारे हे गणपती निसर्गाच्या रक्षणासाठी पूरक ठरणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थने शाडू अथवा प्लास्टर ऑफ पॅरिस यांचा वापर करून गणपती न बनवता इको फ्रेंडली गणपती बाजारात आणले आहेत. चिखलचा गणपती बनविला असून कोणताही रंग अथवा रासायनिक साहेब पदार्थ न वापरता सदर गणपती तयार करण्यात आले आहेत.त्या गणपतीचे एक तासात विघटन होत असू खास गोकाक येथील मूर्तिकारांनी तयार केलेले साधारण एक ते दोन फूट उंचीचे 300 हून अधिक गणपती उपलब्ध करून देण्यात आले आहेत. साधारण 800 ते 2100 रुपये किमतीचे हे गणपती अगदी रेखीव असून यामुळे निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी अथवा प्रदूषण होणार नाही.Eco friendly ganesh

 belgaum

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून मागील तीन वर्षापासून सातत्याने चिखलाचे इको फ्रेंडली गणपती बेळगाव रोटरी क्लब ऑफ नोर्थ तर्फे बाजारात आणण्यात येत आहेत. बेळगावकर गणेश भक्तांकडून देखील सदर उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.सदर उपक्रमातून मिळणारी रक्कम ही हॅप्पी स्कूल या उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे. एका इको फ्रेंडली या उपक्रमातून मिळवलेला निधी दुसऱ्या सामाजिक उपक्रमासाठी वापरून या निमित्ताने शाळा हॅप्पी होणार आहेत.

गणेशोत्सवासाठी बेळगाव मधील प्रत्येक गणेश भक्त प्रयत्न करत असताना पर्यावरण संरक्षणाची आपली जबाबदारी ओळखून, आपल्या घरी देखील इको फ्रेंडली गणपती आणून या संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नॉर्थ यांच्यातर्फे करण्यात आले आहे आहे.रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ चे अध्यक्ष जी. एस.पाटील सेक्रेटरी सुरज ओजा, खजिनदार मुकुंद महागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात येत आहे . तर इको फ्रेंडली गणेश मूर्ती या उपक्रमाचे अध्यक्ष एस. सुरेश सेक्रेटरी मंगेश कटक आणि सहाय्यक म्हणून दुर्गेश हरीटे जितेंद्र बामणे व संस्थेचे सदस्य प्रयत्न करत आहेत.

इको फ्रेंडली मूर्तीसाठी संपर्क
1) For Ramteerthnagar: G. S. Patil 9945059977
2) For College Road: Suraj Oza 8792825318
3) For Tilakwadi: Mangesh Kantak 9449650184
4) For Bhagyanagar, Vadgaon: Durgesh Haritay 97317117387
5) For Kumarswamy Layout: Umesh Gorabal 7406467555
6) For Shahu Nagar: Jeetendra Bamane 9483516969
7) For Vijaynagar: Sagar Koli 9743409511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.