Friday, March 29, 2024

/

सर्व तयारी करूनही पुन्हा एकवार फसली शोध मोहीम

 belgaum

बिबट्याला पकडण्यासाठी शिमोगा येथील दोन प्रशिक्षित हत्तींच्या मागोमाग ट्रँक्यूलायझर शूटर्स, पशू पकडणारे पथक, पोलीस व वनखात्याचे कर्मचारी आदींनी आज बुधवारी दिवसभर बेळगाव गोल्फ मैदान परिसरात शोध मोहीम राबविली. तथापि हे सर्वजण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बिबट्याला शोधून पकडण्यात अपयशी ठरले आहेत.

वन खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोल्फ मैदान परिसरातील बिबट्याच्या वास्तव्याची आज बुधवारी पुन्हा एकदा शहानिशा करण्यात आली होती. त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या दोन ट्रॅप कॅमेऱ्यांनी बिबट्याची तशी छायाचित्रेही टिपली होती.

त्यामुळे आज भल्या पहाटे पहिल्या प्रहरी शोध मोहीम हाती घेण्याची योजना वनखात्याने आखली होती. मात्र हत्तींची निगा राखणाऱ्यांनी आपल्या दोन्ही हत्तींना प्रवासाची दगदग झाली असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे पहाटे ऐवजी आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली.

 belgaum

या शोध मोहिमेत डुकरे, कुत्री आणि मोकाट जनावरे पकडणाऱ्या तज्ञ लोकांना देखील समाविष्ट करून घेण्यात आले होते. बिबट्याला जाळ्यात अडकविण्यासाठी हुक्केरी येथून प्रचंड मोठे (सुमारे 72 फूट लांब) मजबूत जाळेही मागविण्यात आले. त्याचप्रमाणे बिबट्या जेथून पलायन करू शकतो अशा गोल्फ कोर्स मैदानावरील पळवाटा आणि भुयार एकतर अडविण्यात आली अथवा बंद करण्यात आली. शोध मोहीम सुरू झाल्यानंतर बिबट्या जेथून उडी मारून जाऊ शकेल अशा आवार भिंती नजीकच्या जागा हेरण्यात आल्या आणि त्या ठिकाणी मोक्याच्या जागी ट्रँक्यूलायझर शूटर्सना तैनात करण्यात आले होते.Elephant searching

विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणे बिबट्याला शोधण्यासाठी कोणताही ड्रोन कॅमेरा अथवा मुधोळ हाऊंड पथकाला आज बुधवारी तैनात करण्यात आले नव्हते. डुकरं, कुत्री आणि मोकाट जनावरे पकडणाऱ्या व्यावसायिक तज्ञ लोकांच्या जीवाला बिबट्याला पकडताना कोणताही धोका होऊ नये यासाठी सेफ्टी जॅकेट्स पुरवण्यात आले होते.

शोध मोहिमे दरम्यान मुख्य वनसंरक्षणाधिकारी आणि उप वनसंरक्षणाधिकारी शोध पथकांच्या प्रमुखांना मार्गदर्शन करत होते. तथापि हा सर्व खटाटोप करून देखील आज सायंकाळपर्यंत बिबट्याला शोधून पकडण्यात यश आले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.