माजी नगरसेवकांचा गुरुवंदना कार्यक्रमाला पाठिंबा

0
5
Guru vandna ex corporator
 belgaum

बेळगावातील मराठा समाजाच्या एकत्रिकरणासाठी होत असलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाला मराठी भाषिक माजी नगरसेवक नगरसेवकांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा सांस्कृतिक भवन येथे माजी नगरसेवक नगरसेविकांची बैठक पार पडली या बैठकीत सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेळगावसह सीमा भागातील मराठा समाजाला एकत्र करण्या करता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले राजे शहाजी महाराज भोसले यांनी बेंगलोर येथे स्थापन केलेल्या मराठा समाजाचं मठ व मराठा समाजाचे बंगलोर शहरावर आधिपत्य राखण्याकरता मराठा समाजाचे स्वामी बसविले होते.Guru vandna ex corporator

 belgaum

त्याच गादीवर आता मराठा समाजाचे धर्मगुरू श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा नुकताच पट्टाभिषेक पार पडला आहे त्यानिमित्ताने सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने येत्या 15 मे 2022 रोजी गुरुवंदना कार्यक्रमांचं आयोजन केलेला आहे.

2013 ते 2018 च्या बेळगाव महानगरपालिकेच्या 31 महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमास पाठिंबा व मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.