बेळगावचा युवा चित्रपट निर्माता हर्षद नलावडे याच्या 'फाॅलोवर' या चित्रपटाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड केली आहे. यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बेळगावचा हर्षद नलावडे हा पुणे येथील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ...
शेतीच्या खरीप हंगामाला प्रारंभ झाला की शेतातील सुक्या चाऱ्याची उचल केली जाते. मात्र गेल्या वर्षापासून भाताच्या सुक्या चाऱ्याला मागणीच नसल्यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांवर अत्यंत दुःखी मनाने तो चारा शेतातच जाळून टाकण्याची वेळ आली आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे....
हुक्केरी तालुक्यातील हिडिकल डॅम अर्थात राजा लखमगौडा जलाशय परिसरात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती करून पर्यटन केंद्र बनविले जाईल, अशी माहिती वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
जिना राळ ते हिडकल जलाशयात पर्यंतच्या रस्त्याच्या...
गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार सध्या लेंडी नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर बळ्ळारी नाला स्वच्छ केला जाईल, माहिती शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिली.
पावसाळ्यात...
बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022 -23 सालच्या व्यवस्थापकीय समितीचा अधिकारग्रहण सोहळा येत्या शुक्रवार दि. 13 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट नजीक असलेल्या हॉटेल संतोरिनी येथे येत्या शुक्रवारी सायंकाळी 8:30 वाजता हा अधिकार ग्रहण सोहळा होणार...
बेळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्यासह कर्तव्य बजावण्यात केली जाणारी चालढकल यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट पुढे खानापूर रोडवरील गजानन साॅ मिलच्या मागील बाजूस असणाऱ्या वसाहतीतील लोकांना तुंबलेल्या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नरकवास भोगावा लागत आहे. गेल्या दीड...
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे महत्वाकांशी स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांची इतकी दुरावस्था झाली आहे की मृतदेहांना घेऊन जाणारी शववाहिकाच व्हेंटिलेटरवर असल्याचे पहावयास मिळत आहे.
शहरात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून...
गंगावती कोप्पळ येथे नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या ऑल इंडिया इन्व्हिटेश्नल कराटे चॅम्पियनशिप -2022 या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
गंगावती कोप्पळ (कर्नाटक) येथील केबीएन गार्डन क्रीडा संकुलामध्ये उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे अलीकडेच आयोजन करण्यात...