Tuesday, May 7, 2024

/

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ‘यांनी’ मिळविले घवघवीत यश

 belgaum

गंगावती कोप्पळ येथे नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या ऑल इंडिया इन्व्हिटेश्नल कराटे चॅम्पियनशिप -2022 या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले आहे.

गंगावती कोप्पळ (कर्नाटक) येथील केबीएन गार्डन क्रीडा संकुलामध्ये उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत इंडियन कराटे क्लब बेळगाव आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिशनचे अध्यक्ष गजेंद्र बी. काकातीकर व परशुराम काकतीकर यांच्या मार्गदर्शनखाली तहसीलदार गल्ली श्री सोमनाथ मंदिर बेळगावचे आणि मन्नुर येथीलउदयन्मुख होतकरू कराटेपटुंनी 4 सुवर्ण पदक, 4 रजत पदक व 3 कास्य पदक अशा तब्बल 11 पदकांची कमाई करीत बेळगांव जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.Karate

 belgaum

अमिषा होनगेकर (सुवर्ण), संकेत चव्हाण, (सुवर्ण), संजना चित्त्यापचे (सुवर्ण ), प्रदीप मरिगौडर (सुवर्ण ), प्रतीक्षा मरिगौडर (रौप्य), प्रतीक्षा सोबरदर (रौप्य ), यश कारेकर (रौप्य), स्वप्निल नाईक (रौप्य), सिहीली गुंडकल (कांस्य),

आचल तुडयेकर (कांस्य ) आणि तेजस्वीनी देसाई (कांस्य) अशी राष्ट्रीय स्पर्धेत सुयश मिळवणाऱ्या कराटेपटूंची नावे आहेत. त्यांना कराटे प्रशिक्षक विनायक सिद्धाप्पा दंडकर यांचे मार्गदर्शन आणि श्री जननी महिला मंडळ ग्रुप तहसीलदार गल्लीच्या प्रमुख स्वाती गणेश चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.