Monday, April 29, 2024

/

अनगोळ येथे 11 पासून ‘बेळगाव हिंदकेसरी’ जंगी बैलगाडा शर्यत

 belgaum

बेळगाव  लाईव्ह: श्रीराम सेना हिंदुस्तान, अनगोळ यांच्यातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येत्या गुरुवार दि. 11 ते रविवार दि. 14 एप्रिल 2024 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘बेळगाव हिंदकेसरी -2024’ किताबासाठीची बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

अनगोळ (बेळगाव) येथील श्री मरगाईदेवी तलाव या ठिकाणी या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शर्यत खुला गट आणि लहान गट अशा दोन गटात घेतली जाणारा असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक महागडी दुचाकी वाहने बक्षीसा दाखल दिली जाणार आहेत.

खुल्या गटाच्या शर्यतीसाठी दुचाकीसह एकूण 30 बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली असून यापैकी 29 बक्षिसे रोख रकमेची असतील. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास बेळगाव हिंदकेसरी किताबासह दुचाकी (मोटरसायकल) मिळणार असून उर्वरित दुसऱ्या ते तिसाव्या क्रमांकापर्यंतची रोख बक्षिसे अनुक्रमे रुपये 75001,

 belgaum

61001, 51001, 45001, 35001, 31001, 27001, 25001, 24001, 23001, 22001, 21001, 19001, 18001, 17001, 16001, 15001, 14001, 13001, 12001, 11001, 10001, 9001, 8001, 7001, 6001, 5555 व 5001 रुपये अशी असणार आहेत.

लहान गटासाठी दुचाकीसह एकूण 25 बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली असून यापैकी 24 बक्षिसे रोख रकमेची असतील. दुसऱ्या ते पंचविसाव्या क्रमांकापर्यंतची रोख बक्षिसे अनुक्रमे रुपये 35001, 30001, 25001, 20001, 15001, 14001, 13001, 12001, 11001, 10001, 9501, 9001, 8501, 8001, 7501, 7001, 6501, 6001, 5501, 5001, 4501, 4001, 3501 व 3333 रुपये अशी असतील.

Hind kesari

दोन्ही गटातील उपरोक्त विजेत्यांना आकर्षक चषक देखील देण्यात येईल. शर्यतीतील सहभागी प्रत्येक जोडी मालकाला सन्मान चिन्ह, टी-शर्ट व फेटा देऊन सन्मानित केले जाणार आहे. बेळगाव हिंदकेसरी 2024 जंगी शर्यतीच्या निमित्ताने खास बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी 50 रुपये कुपनाची ‘इलेक्ट्रिकल बाईक’ विशेष लकी ड्रॉ योजना राबविण्यात येणार आहे. उपरोक्त दोन्ही गटांसाठी 51वे भाग्यशाली पारितोषिक 5,555 रुपयांचे असणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बैलगाडा पळवण्याची इतकी भव्य शर्यत आयोजित करण्यात आली असून सदर शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी स्पर्धकांनी उमेश कुऱ्याळकर (9740018375, 8147708996), मनोज चवरे (9482912799, 9448065333) अथवा श्याम गौंडवाडकर (9945929200) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक श्रीराम सेना हिंदुस्तान, अनगोळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.