Sunday, September 1, 2024

/

शहापूर तलावाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी

 belgaum

शेतकऱ्यांना वरदान ठरणारा शहापूर तलावाची अर्धवट झालेली खुदाई व इतर विकास कामं येत्या पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पुर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अशी जोरदार मागणी केली जात आहे.

शहापूर तलावाचे पुनरुज्जीवन झाल्यास ते परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहे. या तलावाच्या खुदाईसाठी गेल्या बऱ्याच वर्षापासून रयत गल्ली शेतकरी कमिटी सरकारदरबारी प्रयत्न करत आहे. कारण या तलावाभोवती रयत गल्लीतील शेतकऱ्यांची शेतीच जास्त आहे. मागील मुख्यमंत्री कुमारस्वामीपासून ते बोम्माईपर्यंत सर्वांना सदर तलाव खुदाईसाठी वेळोवेळी लेखी निवेदन पाठवूनही त्याचा कांही उपयोग झालेला नाही. कर्नाटक सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते.

त्यामध्ये शेत जमिनीतील तलावांची खुदाई करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या योजनेचा समावेश केला गेला पाहिजे. बारमाही पाणी साठा रहाण्यासाठी तलाव भरण योजना आखली पाहिजे. तलावात पाणी नसल्यास परिसरातील नदी किंवा धरणाचे पाणी त्यात सोडून परिसरातील शेतीचा आंतरजलसाठा अबाधित ठेवल्यास शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी दिलासा मिळेल. तथापी बेळगावसह परिसरातील अनेक तलाव अशा योजनांपासून अलिप्तच आहेत. त्यातील एक तलाव म्हणजे शहापूर तलाव होय.Lake

शहापूर तलावासंदर्भात बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की, कर्नाटकात 2024 साली अस्तित्वात आलेल्या काँग्रेस सरकार मधील बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या जनता दरबार कार्यक्रमात शहापूर तलाव खुदाई संदर्भात शेतकरी कमीटी व इतर शेतकरी बंधूतर्फे निवेदन दिलेल्या दुसऱ्याच दिवशी तलाव खुदाईच्या कामाला सुरुवात झाली. जवळपास 3/4 फूट खुदाई झाली. मात्र पावसाळा सुरु झाल्याने पुन्हा काम बंद झाले, ते आजपर्यंत सुरु झालेले नाही. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने खोदलेल्या तलावात पाणीच कमी असल्याने ते लवकर आटले. हे लक्षात घेता शहापूर तलावाची आणखी 5/6 फूट खोल खुदाई केल्यास जास्त पाणीसाठा संकलीत होईल. त्याचबरोबर त्यातील पाणी संपल्यास राजहंस गडाजवळच्या आरवाळी धरणातील पाणी त्यात सोडल्यास तलाव भरण योजनां पुर्णत्वास जाईल. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीनीत सतत ओलावा राहून त्यांच्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटेल.

परिणामी शेतकऱ्यांना दिलासा मिळवून ते सरकारला धन्यवाद देतील आणि हे सरकार शेतकऱ्यांना तारणारे सरकार म्हणून नावरुपास येईल, असे मत राजू मरवे यांनी व्यक्त केले. त्यासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरणारा शहापूर तलावाची अर्धवट झालेली खुदाई व इतर राहिलेली विकास कामं येत्या पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पुर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ही त्यांनी समस्त शेतकरी बांधवांच्यावतीने सरकारला केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.