belgaum

बेळगाव जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोऱ्या करणारी टोळी गजाआड

0
Belgaum district map
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हारुगेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २५ लाख ८९ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रायबाग तालुक्यातील हंदिगुंड गावातील रणम्मा देवी मंदिरात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी महादेव बिराज यांनी हारुगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला होता.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने कारवाई करत अदळहट्टी येथील विजय भीमप्पा गुडदिन्नी, कल्लेष अल्लाप्पा मुराबत्ती, शिवानंद विठ्ठल चिक्कट्टी आणि संगमेश शंकर ऐनापूर या चार संशयितांना ताब्यात घेतले.

 belgaum

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १ तोळा ५ मिली सोन्याचे दागिने, ७ किलो ७६० ग्रॅम चांदीचे दागिने, २९ किलो ५०० ग्रॅम कांस्य धातूच्या वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेली एक महिंद्रा पिकअप गाडी जप्त केली आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या आरोपींनी हारुगेरीसह अथणी, कागवाड, ऐगळी आणि लोकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.