बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील सांबरा गावचे सुपुत्र माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शिवाजी चिंगळे वय (75) यांचे रेल्वे अपघाती निधन झाले आहे त्यामुळे बेळगाव क्रीडा क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे.
रविवारी दुपारी बेळगाव जवळील सांबरा येथे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा रेल्वेच्या धडकेत झालेला मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
शिवाजी चिंगळे यांनी कुस्तीमध्ये आशियाई स्पर्धेत आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य आणि कास्य पदके मिळवत बेळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले होते.
त्यांनी एन आय एस कोच म्हणून देखील जबाबदारी पार पडली होती. 28 वर्षे मराठा इन्फ्रंट्री मध्ये ऑनररी कॅप्टन म्हणून सेवा बजावून सेवानिवृत झाले होते काही वर्षे त्यांनी बेळगाव येथील दर्गा तालीम मध्ये वस्ताद म्हणून देखील काम केले होते. बेळगाव परिसरात त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू देखील घडवले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगी व ३ मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या झालेल्या निधनाने बेळगाव परिसरातील क्रीडा क्षेत्राला धक्का बसला आहे.