बेळगाव लाईव्ह: ज्यांनी बेळगाव च नाव क्रिकेट क्षेत्रात देशभरात उज्वल केलं असे बेळगावचे सुपुत्र गोवा रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुभाष कंग्राळकर काळाच्या पडद्याआड झाले आहेत.
गोवा राज्य रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तानाजी गल्ली बेळगावचे रहिवाशी सुभाष कंग्राळकर वय 74 यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सोमवारी दुपारी 12: 30 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) गोवा क्रिकेट संघटना आणि एमसीएचे देखील सदस्य पद त्यांनी भूषवलं होतं.
बेळगाव आणि गोवा भागात ते एक प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून परिचित होते त्यांनी बेळगावच्या गोगो संघातून फलंदाजी करताना अनेकदा त्यांनी अव्वल कामगिरी करत नाव लौकिक मिळवला होता. अनेक रणजी सामान्यातून त्यांनी मॅच रेफ्रिची देखील भूमिका बजावली होती. गोवा रणजी क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते.
क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्या नेतृत्वाखाली 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्व कप जिंकलेल्या टिमच्या निवडीचे दक्षिण विभागातून निवड कमिटीचे प्रमुख सदस्य होते.