Wednesday, December 4, 2024

/

मध्यवर्ती समितीने केली लोकसभा उमेदवारांची अधिकृत घोषणा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सीमा भागातील मराठी भाषा संकटात सापडली आहे. न्यायालयात लढा असला तरी रस्त्यावरील लढा करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

केवळ निवडणुकी पुरताच मराठीचा पुळका आलेल्या राष्ट्रीय पक्षांना भाषेचे काहीही देणे घेणे नाही, त्यामुळे सीमा भागात मराठीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आपली ताकद दाखवून देण्यासाठी ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी माणसांना समितीच्या पाठीशी थांबावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.

रेल्वे  ओवर ब्रिज मराठा मंदिरच्या सभागृहात रविवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार किणेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीला उमेदवार देण्याबाबत शहर तालुका खानापूर तालुका या घटक समितीच्या बैठका झाल्या. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार महादेव पाटील आणि निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीमा लढ्याचा भाग म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवत आली आहे. सध्या मराठीवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आम्ही न्याय मागत असलो तरी कन्नडसक्ती करण्यात येत आहे.Mes Central committee

नामांतरण करण्यात आले असून सरकारच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे या विरोधात आपली ताकद दाखवण्यासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे. ज्या मतदारसंघात मराठी भाषिक अधिक संख्येने आहेत, त्या ठिकाणी समितीचा उमेदवार पहिल्या क्रमांकाची मते मिळतील, अशा प्रकारे प्रचार करावा लागणार आहे, असे सांगितले.

राष्ट्रीय पक्ष आता मराठी भाषा भगवा ध्वज यावर मराठी मध्ये मागण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.

त्यावेळी राष्ट्रीय पक्ष कुठेही नव्हते. मराठी तरुणांनी आंदोलन केले त्यांना कारागृहात डांबण्यात आले. मराठीवर अत्याचार होत असताना राष्ट्रीय पक्ष येत नाहीत. त्यामुळे आता आपणच एकत्रितपणे हे निवडणूक जोरकसपणे लढणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीत मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.