Tuesday, November 5, 2024

/

त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माजी आमदारांचे स्पष्टीकरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मी हिंडलगा येथे केलेल्या भाषणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना खर्‍या हिंदुत्वाची काळजी असल्यास गो-हत्या निषेध कायदा आणि धर्मांतर विरोधी कायद्याला समर्थन द्यावे, असे आवाहन केले होते.

त्यांच्याबद्दल कोणतेही कमीपणाचे वक्तव्य केले नाही. एक पेगबद्दल बोललो होतो पण त्यावेळी त्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. अक्का म्हणजे हेब्बाळकर असं होत नाही, पेग म्हणजे दारू असे का समजता, पेग म्हणजे एनर्जी ड्रिंकसुद्धा असते, असे माजी आमदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकारांना सांगितलेे.

हिंडलगा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना संजय पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे. त्यावर आज बोलताना संजय पाटील यांनी, मला आई आणि मुलगी आहे. महिलांबद्दल मला आदर आहे. त्यामुळे मी हेब्बाळकर यांच्या विरोधात चुकीचे बोललेलो नाही.

महिलांचा अपमान झाल्याचे सांगत हेब्बाळकर राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत. माझ्या घरावर शेकडो महिलांना पाठवून अधिकाराचा दुरुपयोग करत आहेत. माझी आई 90 वर्षांची आहे. मी हृदयाचा रुग्ण आहे. महिला माझ्या घरासमोर येऊन अर्वाच्च शब्दात मला शिवीगाळ करतात, ते बरोबर आहे का, असा सवाल हे संजय पाटील यांनी केला.

महिलांचा अपमान झाला असं चिकोडी, खानापूरच्या उमेदवार म्हणत नाहीत. केवळ लक्ष्मी हेब्बाळकर एकट्याच अपमान झाला असे सांगत आहेत. त्या नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवरील टीका करत आहे, ही निवडणूक सकारात्मक विचाराने व्हावी, कोणी खालची पातळी गाठू नये, असेही ते म्हणाले.Sanjay patil ex mla

शेट्टर म्हणाले…

दरम्यान रविवारी सकाळी पत्रकारांनी भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना माजी आमदार संजय पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता याबाबत मला काही माहिती नाही यावर संजय पाटीलच स्पष्टीकरण देतील असे म्हटले होते.

दरम्यान संजय पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या दरम्यान शेट्टर देखील मंचावर उपस्थित होते मात्र सदर वक्तव्य संजय पाटील यांनी मराठी भाषेत केल्याने ते शेट्टर यांना कदाचित मराठीत समजले नसावे म्हणून त्यांनी असं व्यक्त केले असावेत असा प्रश्न यानिमित्ताने मीडियात चर्चिला जात होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.