Sunday, April 28, 2024

/

पुन्हा एकदा एस आर एस… हिंदुस्थान

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव येथील क्रिकेट स्पर्धेत आरजीपीएल चषक -2024 क्रिकेट स्पर्धा जिंकत या चषकावर नाव कोरले आहे तर राजहंस गल्लीचा राजा हा संघाने हा संघ उपविजेता ठरला.मागील आठवड्यात देखील भवानी नगर येथील क्रिकेट स्पर्धा एस आर एस… हिंदुस्थान संघाने जिंकली होती पुन्हा एकदा एक स्पर्धा जिंकली आहे.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राजहंस गल्लीचा राजा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना, ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या,प्रतिउत्तरार्थ धावा करत असताना, एस. आर. एस. हिंदुस्थान या संघाने अवघ्या ३ षटकातच १ गडी बाद ३० धावा करत विजय संपादन केला.

अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून उमेश बाळू कुऱ्याळकर यांची निवड झाली आहे.तसेच मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला गजानन हसबे याने एकूण १० गडी बाद करत पुरस्कार पटकाविले.
उत्कृष्ट फलंदाज ठरला तो ओमकार संभाजी जाधव याने एकूण 85 धावा जमविल्या.Srs h

 belgaum

नागेश सोमनाचे हा अपकमिंग प्लेयर ठरला,
संपूर्ण मालिका वीर ठरला तो उमेश बाळू कुऱ्याळकर यांने एकूण १३१ धावा व ६ गडी बाद करत मालिकावीराचा मानकरी ठरला.

मनोज चावरे, राजू मुधोळकर, रवी येळळूरकर, बाळू कुऱ्याळकर, संदीप मुधोळकर, मल्लाप्पा होळकर आदींनी बक्षीस वितरण कार्यक्रमात सहभाग घेतला होता

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.