उत्तम कामगिरी केली असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले आहे.
संकेश्वर येथील छ. शिवाजी महाराज जयंती उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री...
कर्नाटक मेडिसनल प्लांट अथोरिटी आणि बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वनखात्यातील अधिकारी कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यासाठी आयोजित वनौषधीसंदर्भात माहिती देऊन जनजागृती करणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली.
कर्नाटक मेडिसनल प्लांट अथोरिटी आणि बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वनखात्यातील अधिकारी कर्मचारी...
शिवजयंती उत्सवाची मोठी परंपरा असलेल्या बेळगाव शहरात आज सायंकाळी डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून यासाठी शहरातील सर्व चित्ररथ सज्ज झाले आहेत. चित्ररथ देखाव्यांसाठी सध्या संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. विशेष म्हणजे माळी गल्ली येथील...
दोन वर्षाच्या खंडानंतर आज सायंकाळी बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले...
बेळगाव शहरातील यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे पारंपारिक पद्धतीने आयोजित शिवजयंती अर्थात शिवजन्मोत्सव सोहळा सोमवारी सायंकाळी शिवमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.
यश ऑटोच्या गणेशपूर येथील वर्कशॉपच्या ठिकाणी या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंत संजय...
जीवन संघर्ष फाउंडेशन, फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि कॅम्प पोलीस यांच्या समन्वयातून एका मनोरुग्ण वयोवृद्ध भिक्षुक महिलेला बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या सुळगा -हिंडलगा येथील भाजी विक्रेत्यांना एक भिक्षुक महिला असंबद्ध बडबडत ये -जा...
अखिल भारतीय पातळीवरील दुसरी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021 मध्ये सुवर्ण पदक हस्तगत करून स्पर्धा गाजविणाऱ्या बेळगावच्या अक्षता कामती हिचे काल बेळगावामध्ये उस्फुर्त स्वागत करून सत्कार करण्यात आला.
बेंगलोर येथे गेल्या महिन्यात अखेर पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या खेलो इंडिया...