Thursday, April 25, 2024

/

वनौषधीसंदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

 belgaum

कर्नाटक मेडिसनल प्लांट अथोरिटी आणि बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वनखात्यातील अधिकारी कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यासाठी आयोजित वनौषधीसंदर्भात माहिती देऊन जनजागृती करणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली.

कर्नाटक मेडिसनल प्लांट अथोरिटी आणि बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वनखात्यातील अधिकारी कर्मचारी फ्रन्टलाइन वर्कर्स आणि विलेज फॉरेस्ट कमिटी यांना मेडिसनल प्लांट अर्थात वनौषधी बद्दल माहिती देऊन जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत गेल्या 27 व 28 एप्रिल रोजी दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. यापैकी सुवर्ण विधान सौध येथे 28 रोजी झालेली कार्यशाळा संपूर्णपणे आरएफओ, डीवाय.आरएफओ आदी वरिष्ठ वनाअधिकारी, वनरक्षक आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यासाठी होती. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मेडिसिनल प्लांट्स बोर्ड आणि कर्नाटक मेडिसनल प्लांट्स अथोरिटी बेंगलोरचे सीईओ सुदर्शन आणि त्यांच्या पत्नी बायोडायव्हर्सिटी बोर्ड कर्नाटकच्या सदस्य अनिता अरेकल यांच्यासह बेळगावचे डीएफओ हर्षा भानू तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये बेळगावचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. यावेळी रिसर्च पर्सन अर्थात संसाधन व्यक्ती म्हणून निमंत्रित डाॅ. श्रीनिवास पाटील यांचे व्याख्यान पहिले ठेवण्यात आले होते. आत्ताच्या वनौषधींची पूर्वीच्या वनौषधींशी प्रासंगिकता काय आहे? पूर्वीच्या आयुर्वेदाचा पारंपारिक उपयोग आणि आता केला जाणारा आयुर्वेदाचा वापर यात काय फरक आहे? पारंपारिक आयुर्वेदाला जोड देणे किती महत्त्वाचे आहे, वनौषधी आणि पर्यायाने आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी काय केले जात आहे आणि काय करता येऊ शकते यासंदर्भात डॉ. श्रीनिवास पाटील यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.Forest

 belgaum

अन्य तज्ञांपैकी डॉ. रूपा यांनी कमर्शियल व्हॅल्यु ऑफ मेडिसनल प्लांट या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पश्चिम घाटात जेवढ्या वनौषधी आहेत त्यांचे सर्वेक्षण करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन संस्थेच्या बेळगाव शाखेतील प्लांट रिसर्च ऑफिसर हर्षा हेगडे यांचे वनौषधी.संदर्भात व्याख्यान झाले.

सदर कार्यशाळेस वनखात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांसह फ्रन्टलाइन वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.