बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करून अनैसर्गिक विचित्र वर्तन करणाऱ्या एकूण तिघा युवकांना मार्केट व शहापूर पोलिसांनी काल अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे समर्थ भगवंत नवले (वय 21, रा. रामलिंग खिंडगल्ली बेळगाव), शंकर मारुती गोल्लर (वय 26) आणि सदाशिव गौरीश पुजारी (वय 26, दोघेही रा. भारतनगर खासबाग बेळगाव) कशी आहेत.
यापैकी समर्थ हा भांदुर गल्ली येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाचा नशेत विचित्र वर्तन करत वावरताना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना सापडला.
दुसऱ्या प्रकरणात शंकर व सदाशिव हे उर्वरित दोघेजण पॅटसन शोरूम जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून विचित्र वर्तन करताना शहापूर पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध मार्केट व शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




