belgaum

सोशल मीडियावर कांहीही पोस्ट करण्यापूर्वी राहा सावध :

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा पोलिसांनी सोशल मीडियावर उपद्रव निर्माण करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी एक नवीन ‘सायबर सेल’ सुरू केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली आहे.

सदर सायबर सेलची टीम प्रक्षोभक पोस्ट्सवर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून धमकावणारे व्हिडिओ किंवा संवाद (डायलॉग्स) प्रसारित करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे जर कोणी मर्यादा ओलांडली, तर त्यांच्यावर कठोर आणि त्वरित कारवाई केली जाईल, असा पोलीस विभागाचा संदेश स्पष्ट आहे.

आधुनिक तांत्रिक पाळत ठेवण्याच्या यंत्रणेमुळे आता संशयास्पद ‘स्टेटस’ आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचा मागोवा घेणे पोलिसांना सहज शक्य झाले आहे. हा सायबर सेल 24 तास कार्यरत राहणार असला तरी गैरप्रकारांची माहिती मिळवण्यासाठी पोलीस जनतेकडून मिळणाऱ्या सूचनांवरही अवलंबून आहेत.

 belgaum

महत्त्वाची सूचना म्हणजे केवळ मूळ पोस्ट तयार करणाऱ्यांवरच कारवाई होईल असे नाही, तर अफवा (फेक न्यूज) किंवा द्वेषपूर्ण मजकूर (हेट स्पीच) फॉरवर्ड करणाऱ्यांवरही अर्थात पुढे पाठवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी पुढे स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.