belgaum

अनैतिक संबंध, पॉलिसीसाठी पत्नीकडून पतीचा अमानुष खून

0
Crime news logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अनैतिक संबंध आणि पॉलिसीच्या 2 कोटी रुपयांसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या माजी सैनिक पतीचा सलाईन मधून विष देऊन अमानुष खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी हे प्रकरण घडकीस आणले आहे.

खून झालेल्या माजी सैनिकाचे नाव संदीप मंजरगी (वय 46, रा. घोडगेरी, ता. हुक्केरी जि. बेळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार यमकनमर्डी यात्रेला गेलेल्या संदीप याचा केल्या 13 मार्च रोजी घटप्रभा जवळ अपघात झाला होता.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या संदीप याला घटप्रभा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मरण ओढवेल अशी कोणतीही गंभीर इजा त्याला झाली नव्हती. मात्र डॉक्टर डिस्चार्ज देण्याच्या तयारीत असतानाच तिसऱ्या दिवशी 15 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर अपघातात मृत्यू झाला असे समजून त्याच्यावर घोडगेरी येथे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

 belgaum

तथापि यापूर्वी अनेक खून प्रकरणाचा यशस्वी छडा लावणारे यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी संशयावरून तपास केला असता प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली. प्राथमिक तपासात संदीप मंजरगी हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला सलाईन मधून विष घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

अनैतिक संबंध आणि पॉलिसीचे 2 कोटी यासाठी मयत संदीपच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी हे अमानुष कृत्य केल्याचा कयास आहे. तीन महिन्यापूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी आज गुरुवारी घोडगेरी येथील संदीपचा दफन केलेला मृतदेह उकरून काढून पुन्हा तपासाला सुरुवात करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.