belgaum

शेतकऱ्यांनी पावसाच्या दडिने करपलेली पीकं कापली

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: खरिप हंगामात पेरणी करुन उगवलेल्या पीकानां जूलैला पाऊस नसल्याने तेंव्हा पीकं करपली.त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने थोडी पीकं तग धरुन राहिली.पण आता ऐन वेळेला परत पावसाने दडी दिल्याने बेळगाव परिसरातील शेतकरी अत्यंत संकटात सापडला आहे.

एकिकडे बळ्ळारीनाला पुराने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान तर आता इतर शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान पहाता अत्यंत कठिण परिस्थिती निर्माण झाल्याने खर्च केलेला तरी मीळतो कि सारच मातीमोल होत कि काय याचं काळजीत शेतकरी आहेत.अनेक शेतकऱ्यांनी तर पीकांची दयनिय परिस्थिती पाहून रोटावेटर मारुन टाकला.

तर अनेक शेतकरी माणसं लावून एक फूटभर येऊन वाळलेली पीकं कापून टाकत आहेत.अनेक शेतकऱ्यांनी तर भाड्याने शेती केली आहे.ते तर कोलमडूनच गेले आहेत.कारण शेती मालकाला वर्षाला ठरल्याप्रमाणे भाडे द्यावेच लागणार परत खर्च केलेला वाया.म्हणजे एकरी 30/40 हजार खर्च तर मालकाला 15000 हजार म्हणजे तो शेतकरी पुरता संपलाच.

 belgaum


सरकारची भरपाई गु़ठ्याला 70 रु प्रमाणे देतात.तेही अशाश्वतच.तेंव्हा सरकारने भाड्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांची समती घेऊन भरपाई देऊन दिलासा दिल्यास उपकार होतील.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.