belgaum

बेळगाव हिवाळी अधिवेशनासाठी आत्मदहन प्रतिबंधक पथक सज्ज

0
SUvarna vidhan soudh
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आत्मदहनासारख्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

अधिवेशनादरम्यान शेतकरी, कामगार संघटनांसह विविध संस्थांकडून आंदोलने केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष आत्मदहन प्रतिबंधक पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकातील पोलिसांसाठी १८ नोव्हेंबर रोजी बीम्स रुग्णालयाच्या सभागृहात विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, बचावकार्य आणि आवश्यक वैद्यकीय उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

 belgaum

या प्रशिक्षणाला आत्मदहन प्रतिबंधक पथकाचे प्रमुख तथा सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यासह पथकातील नियुक्त पोलीस अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.