belgaum

आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात ₹2,000 ची वाढ;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्यातील आशा कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या मासिक मानधनात ₹2,000 ची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2027 पासून लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत टिपणीत स्पष्ट करण्यात आले आहे.

28 नोव्हेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आशा कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आशा कार्यकर्त्यांचे मासिक मानधन दरमहा ₹2,000 ने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मानधनवाढ कोणत्या तारखेपासून लागू करायची, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1 जानेवारी 2027 पासून ही वाढ लागू करण्यास सकारात्मक मान्यता दिली. या निर्णयानंतर आशा कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून आपले आंदोलन मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे.

 belgaum

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव एस. एस. नाकुल यांनी 29 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत टिपणी जारी केली आहे. 1 जानेवारी 2027 पासून आशा कार्यकर्त्यांच्या मासिक मानधनात ₹2,000 ची वाढ लागू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया प्राधान्याने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील आशा कार्यकर्त्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या मानधनवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.