Friday, April 19, 2024

/

मनोरुग्ण महिला हॉस्पिटलमध्ये दाखल

 belgaum

जीवन संघर्ष फाउंडेशन, फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि कॅम्प पोलीस यांच्या समन्वयातून एका मनोरुग्ण वयोवृद्ध भिक्षुक महिलेला बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या सुळगा -हिंडलगा येथील भाजी विक्रेत्यांना एक भिक्षुक महिला असंबद्ध बडबडत ये -जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी सदरची माहिती जीवन संघर्ष फाउंडेशनचे प्रमुख गणपत पाटील यांना दिली. तेंव्हा पाटील यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि अवधूत तुडयेकर यांना देखील संबंधित घटनेची माहिती दिली.

 belgaum

त्यानंतर हे सर्वजण कॅम्प पोलिसांसह पृथ्वीसिंग फाउंडेशनचे प्रमुख पृथ्वीसिंग यांच्यासमवेत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या वयोवृद्ध मनोरुग्ण वृद्धेची विचारपूस करून 108 रुग्णवाहिकेतून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.