Daily Archives: May 7, 2022
बातम्या
सकल मराठा समाजाची अशी आहे भूमिका
बेळगावात आगामी 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रक देऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजातर्फे 15 मे 2022 रोजी समाजहितासाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी व मराठा समाजाचे गुरु परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांचा तेरावे धर्मगुरू...
बातम्या
नगरसेवकांनी घेतली दखल : झाली ‘त्या’ गटारीची स्वच्छता
नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाची खडी -माती पडून बुजलेल्या भांदूर गल्ली व पाटील मळा पाठीमागील रेल्वे मार्गाशेजारील मोठ्या गटारीची साफसफाई आज दुपारनंतर रेल्वे खात्याकडून करण्यात आल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहराच्या प्रभाग क्र. 10 मधील भांदूर गल्ली आणि...
बातम्या
*जागतिक व्यंगचित्र स्पर्धेत जगदीश कुंटे यांना पारितोषिक*
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ४ व ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
ही स्पर्धा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टूनिस्ट कंबाईन या व्यंगचित्रकारांच्या संघटनेने संयुक्तरित्या...
बातम्या
मराठा बँक अमृत महोत्सवाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण
बेळगाव शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व संचालकांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना येत्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण दिले.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा वर्धापन समारंभ येत्या बुधवार दि. 11 मे...
बातम्या
केंद्रीय विद्यालयात कोरोना अनाथांना मोफत प्रवेश
कोरोनामुळे पालक गमावल्याने अनाथ झालेल्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार असून पंतप्रधान सहाय्यता निधीतून यासाठीचा खर्च केला जाईल.
देशभरात ज्या मुलांचे पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना केंद्रीय विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश दिला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केंद्रीय...
बातम्या
डीसीसी बँक, अपेक्स बँक विलीनीकरण नको : रमेश कत्ती
केंद्र आणि राज्य सरकारने सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका (डीसीसी) आणि अपेक्स बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून ही प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे आवाहन बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले आहे.
हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावातील हुल्लोळी अरिहंत...
बातम्या
आणखी महागला घरगुती गॅस सिलेंडर
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आज शनिवारपासून आणखी 50 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या प्रती घरगुती गॅस सिलेंडर मागे नागरिकांना 999.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
एलपीजीच्या घरगुती गॅस सिलेंडर प्रमाणे व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ करण्यात...
बातम्या
11 रोजी द. म. शिक्षण मंडळ सुवर्ण महोत्सवाची सांगता
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा 2019 -20 सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाच्या साप्ताहिक राष्ट्रवीरचा शताब्दी महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता ज्योती महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची...
बातम्या
आमदारांसह अधिकारी ‘याकडे’ लक्ष देतील का?
रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाची खडी -माती मुख्य गटारीत पडून गटार बुजल्यामुळे भांदूर गल्ली व पाटील मळा पाठीमागील भरवस्तीतील गटारी मोठ्या प्रमाणात तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ याकडे लक्ष देण्याची...
बातम्या
बेळगाव जिल्हातील संमेलन संयोजकांना आवाहन*
बेळगाव जिल्हात 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविली जातात . ही संमेलने ग्रामीण भागात होत असतात . बेळगाव शहरात ही संमेलन सन 2020 पासून सुरु केले आहे .
यावर्षी हे ३ रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...