Friday, April 19, 2024

/

बेळगाव जिल्हातील संमेलन संयोजकांना आवाहन*

 belgaum

बेळगाव जिल्हात 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविली जातात . ही संमेलने ग्रामीण भागात होत असतात . बेळगाव शहरात ही संमेलन सन 2020 पासून सुरु केले आहे .

यावर्षी हे ३ रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 8 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत संपन्न होणार आहे .

बेळगाव जिल्हातील कडोली , कुद्रेमानी , बेळगुंदी , सांबरा , उचगाव , मण्णूर , मचिगड (खानापूर ) , कावळेवाडी , प्रगतशिल लेखक संघ बेळगाव , कारदगा (निपाणी ) या सह आदी ठिकाणी ही संमेलन भरून मराठीचा जागर केला जातो .Marathi sammelan

या संमेलनाचे संयोजक यांनी बेळगाव नगरीतील या संमेलनात सर्व पदाधिकारी यांच्या सह उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील , जिल्हाध्यक्ष अॅड . सुधीर चव्हाण व महिला कार्यकारणी उपाध्यक्षा अरुणा गोजे पाटील यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.