बेळगाव शहर आणि उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
शहर उपनगरातील विविध प्रमुख...
अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांपासून फारकत घेतलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी अखेर आज बेळगाव भाजपच्या बैठकीमध्ये प्रकट झाले.
मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या कांही महिन्यांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही भाजप नेत्यांच्या कार्यक्रमाकडे न फिरकलेले आमदार रमेश जारकीहोळी आज मात्र...
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेमध्ये सरकारी परिपत्रके मिळावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या 2021 साली धर्मवीर संभाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा बेकायदेशीर ठरवून खटला दाखल केला होता. या खटल्यातील 31...
* बेळगाव कोरोना मध्ये पितृछत्र हरवलेल्या अंकिता व अनिकेत या दोन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून जायंट्स ग्रुप बेळगाव (मेन) च्या वतीने त्या दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यांचे वडील दीपक देशपांडे यांचे 2021 मध्ये तामिळनाडू...
कर्नाटक राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय होईल. तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजपचे राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी बेळगावला आले असता...
शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात...
बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे आज गुरुवारी सकाळी थरारक अपघात झाला. ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. ब्रेक फेल झाल्याने मालवाहू वाहनाने बसला धडक दिली, परंतु सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
शहरातील प्रमुख चौक असलेल्या कित्तूर चन्नम्मा सर्कल...
कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळाकडून सांबरा विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशी परिवहन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 1 जून 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे.
सांबरा विमानतळ प्राधिकरण आणि वायव्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये काल...
आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या अपघातग्रस्त अंथरुणाला खेळून असलेल्या मुलाला पुन्हा त्याच्या पायावर उभे करण्यासाठी खर्च करणाऱ्या रोहिनी तेंडुलकर यांना आशेचा किरण दिसला असून डॉक्टरां त्यांचा मुलगा उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रोहिणी यांनी आपल्या मुलासाठी पुन्हा आर्थिक...
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत धामणे ग्रामपंचायतीकडून गावच्या स्मशानभूमीच्या जागेमध्येच ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारण्याचा अट्टाहास केला जाण्याबरोबरच आता त्याठिकाणी जेसीबीच्या साह्याने काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणे ग्रामपंचायत इमारत मोडकळीस आल्याने नव्याने ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी गावातील स्मशानभूमीच्या...