Thursday, April 25, 2024

/

सांबरा विमानतळ बससेवा 1 जूनपासून प्रारंभ

 belgaum

कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळाकडून सांबरा विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशी परिवहन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 1 जून 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे.

सांबरा विमानतळ प्राधिकरण आणि वायव्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये काल बुधवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. सांबरा विमानतळावरून परिवहन बस सेवा सुरू केली जावी अशी मागणी वर्षभरापासून सुरू आहे.

विमानतळ विकास आढावा बैठकीत याबाबत वेळोवेळी चर्चा देखील झाली आहे. त्यानुसार सांबरा विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य आणि परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नाईक, डी टीओ के. के. लमानी आदींची बैठक झाली. या बैठकीत येत्या 1 जून पासून सांबरा विमानतळ ते रेल्वे स्थानक अशी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.Shuttle Bus airport

 belgaum

नवी दिल्ली येथून येणाऱ्या विमानतळाच्या वेळापत्रकानुसार एक बस सोडली जाणार असून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर विमान सेवांच्या वेळापत्रकानुसार बस सेवा सुरू केली जाणार आहे.

नवी दिल्ली येथून येणारे विमान प्रवासी टॅक्सी किंवा रिक्षाचा वापर न करता बस सेवेचा लाभ घेतात. त्यासाठी प्रवाशांना विमानतळ ते सांबरा गावापर्यंत पायपीट करावी लागते. यासाठी प्रथम दिल्ली विमान सेवेच्या वेळेत सांबरा विमानतळासाठी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही बस सांबरा विमानतळावरून मध्यवर्ती बस स्थानक मार्गे बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे.

दरम्यान परिवहन महामंडळाकडून सांबरा विमानतळाला सोडल्या जाणाऱ्या बसचे ब्रँडिंग केले जाणार आहे. त्यासाठी नवी बस उपलब्ध करून दिली जात असून ही बस पाहता क्षणीच ती विशेष करून सांबरा विमानतळाकडेच जाणार असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येईल. त्यासाठी बसवर विमानतळाशी संबंधित आकर्षक जाहिरात देखील केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.